नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याने किएरॉन पोलार्डला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी जोडण्यात मोलाची भूमिका बजावली. ब्राव्हो २००८ आणि २०१० या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळला. तो सीएसकेसोबत जुळताच मुंबई संघ ब्राव्होचा पर्याय शोधत होता.‘क्रिकबझ’शी बोलताना ब्राव्हो म्हणाला,‘ मुंबई इंडियन्स संघाला माझ्या जागी बदली खेळाडू हवा होता. मी त्यांना पोलार्डचे नाव सुचविले. त्यांनी पोलार्डशी चर्चा सुरू केली तेव्हा तो एका क्लबसाठी खेळत होता. त्यावर मी मुंबईला ड्वेन स्मिथचे नाव सुचविले, त्यांनी स्मिथला माझा पर्याय म्हणून संघात घेतले. पुढच्या वर्षी चॅम्पियन्स लीगदरम्यान मी राहुल संघवीसोबत चर्चा केली व पोलार्ड येथे असल्याची माहिती दिली. तुम्ही पोलार्डला भेटायला जा, असे सुचविले.’ त्यावर्षी नंतर राहुल संघवी आणि रॉबिनसिंग हे मुंबई सोडून हैदराबाद संघाशी जुळले होते.राहुल आणि रॉबिन हे पोलार्डकडे दोन लाख अमेरिकन डॉलरचा करार घेऊन गेले. पोलार्डने करार पाहिला तेव्हा त्याला स्वत:वरच विश्वास नव्हता. नंतर पोलार्डने मला विचारले, ‘हे खरे आहे ना.’ अशा प्रकारे पोलार्डची मुंबई इंडियन्स संघात एन्ट्री झाली. पोलार्डने मुंबईसाठी आतापर्यंत ३१९१ धावा केल्या शिवाय ६३ गडी देखील बाद केले आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘त्यांना बदली खेळाडू हवा होता, अन् मी...', ब्राव्होनं सांगितलं मुंबई इंडियन्समध्ये कशी झाली पोलार्डची एन्ट्री!
‘त्यांना बदली खेळाडू हवा होता, अन् मी...', ब्राव्होनं सांगितलं मुंबई इंडियन्समध्ये कशी झाली पोलार्डची एन्ट्री!
राहुल आणि रॉबिन हे पोलार्डकडे दोन लाख अमेरिकन डॉलरचा करार घेऊन गेले.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 5:56 AM