मोठी बातमी : AB de Villiers पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार का?; क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं दिली ब्रेकिंग न्यूज

एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करून आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:09 PM2021-05-18T17:09:45+5:302021-05-18T17:34:58+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING: AB de Villiers will not come out of international retirement, confirms Cricket South Africa | मोठी बातमी : AB de Villiers पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार का?; क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं दिली ब्रेकिंग न्यूज

मोठी बातमी : AB de Villiers पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार का?; क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं दिली ब्रेकिंग न्यूज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL )सह अन्य ट्वेंटी-20 लीग गाजवणारा एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करून आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख व माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, मुख्य प्रशिक्षक व माजी यष्टिरक्षक मार्क बाऊचर यांनी तसे संकेत दिले होते. एबी डिव्हिलियर्सची चर्चाही सुरू असल्याचे सांगितले होते. त्याच संदर्भात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( Cricket South Africa) मंगळवारी ब्रेकिंग न्यूज दिली.

15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एबी डिव्हिलियर्सनं तीनवेळा वर्षातील आयसीसीचा सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला.  2019मध्ये विस्डेननं निवडलेल्या दशकातील सर्वोत्तम पाच खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता. त्यानं आफ्रिकेच्या तीनही फॉरमॅटमधील संघाचे नेतृत्वही केलं. पण, दुखापतींमुळे त्यानं कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. 2017मध्ये त्यानं मर्यादित षटकांच्या संघाचेही नेतृत्व दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवले.  मे 2018मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जानेवारी 2020मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दक्षिण आफ्रिकेचा संघाही 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप साठी त्याच्या नावाचा विचार करत होते. अशीच चर्चा 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही झाली होती.   ( AB de Villiers will not come out of international retirement, confirms Cricket South Africa) 

पण, मंगळवारी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. एबी डिव्हिलियर्सनं निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं सांगितले. त्यामुळे एबी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला आता कायमचा पूर्णविराम लागला आहे. ( "Discussions with AB de Villiers have concluded with the batsman deciding once and for all, that HIS RETIREMENT WILL REMAIN FINAL.")

एबीनं 114 कसोटींत 50.66च्या सरासरीनं 8765 धावा केल्या आहेत. त्यात 22 शतकं व 46 अर्धशतकांचा समावेश असून नाबाद 278 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 228 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर 25 शतकं व 53 अर्धशतकांसह 9577 धावा आहेत. 78 ट्वेंटी-20त 1672 धावा त्यानं केल्या आहेत.
 

Web Title: BREAKING: AB de Villiers will not come out of international retirement, confirms Cricket South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.