बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah) यांनी काल आगामी स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले. आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक स्पर्धांच्या वेळापत्रकांचा त्यात समावेश होता आणि त्यात महत्त्वाच्या आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत - पाकिस्तान ( India vs Pakistan) यांना एका गटात ठेवण्यात आले आहे. जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB ) अध्यश्र नजम सेठी ( Najam Sethi) यांचा जळफळाट झाला. त्यांनी जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केलेच, शिवाय शाह यांनी आता पाकिस्तान सुपर लीगचे ( PSL) वेळापत्रकही जाहीर करावे असा खोचक टोलाही लगावला. पण, आशियाई क्रिकेट परिषदेने PCB अध्यक्षांना सडेतोड उत्तर दिले.
...मग आम्हीही तुम्हाला पाकिस्तानात बोलावणार नाही; PCB अध्यक्षांचे जय शाह यांच्यावर गंभीर आरोप
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा... नजम सेठी म्हणाले की, एकट्याने घेतलेल्या निर्णयावर मला राग किंवा आश्चर्य वाटत नाही. संपूर्ण परिषदेत कोणाशीही बोलणे झालेले नाही. अशा प्रकारे उद्या मीही प्रमुख झाल्यावर घरी बसून निर्णय घेईन. निदान फोन तरी करायला हवा होता. आशियाई क्रिकेट परिषदेच्या विकास मंडळाने हे निर्णय घेतले. या मंडळात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व नव्हते. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवण्यातही नाही आले.
'माझ्या माहितीनुसार आम्हाला सांगण्यात आले नव्हते. आमच्यासाठी हा निर्णय अचानक आला. याआधीही जय शहा यांनी विधान केले होते, ज्यावर माझ्या आधी हे पद भूषवणाऱ्या रमीज राजा यांनी आक्षेप घेतला होता आणि तेही संतापले होते. गोष्ट अशी आहे की एकीकडे पाकिस्तानने भारतात येऊन वर्ल्ड कप खेळावा अशी तुमची इच्छा आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणता की आम्ही पाकिस्तानात जाऊन आशिया चषक खेळणार नाही. उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे, तेही खेळणार नाहीत का?
आशियाई क्रिकेट परिषद काय म्हणतंय?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच ACC ने वेळापत्रक ठरवले आहे. ACCच्या विकास समिती आणि फायनान्स व मार्केटींग समितीसोबत १३ डिसेंबर २०२२ मध्ये बैठक झाली आणि त्यात हा निर्णय घेतला गेला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह सर्व सदस्यांना २२ डिसेंबरला वेळापत्रकाचं कॅलेंडर पाठवण्यात आले, असे ACC ने स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: BREAKING: Asian Cricket Council responds to PCB Chairman’s social media comments. ACC has rubbished the comments made by PCB chairman najam sethi, labelling them as "baseless"
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.