Ashes 2019 : दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, प्रमुख गोलंदाजाची वापसी

ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर केला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:16 PM2019-08-13T16:16:37+5:302019-08-13T16:20:33+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING: Australia's 12-man squad for the 2nd Ashes Test; Josh Hazlewood to replace James Pattinson | Ashes 2019 : दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, प्रमुख गोलंदाजाची वापसी

Ashes 2019 : दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, प्रमुख गोलंदाजाची वापसी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर केला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीतून मालिका बरोबरीत सोडवण्याचा निर्धार यजमान इंग्लंडने केला आहे. पण, त्यांच्या या मनसुब्याला धक्का देण्याची तयारी ऑसींनी केली आहे. त्यांनी दुसऱ्या कसोटीसाठी संघात प्रमुख गोलंदाजाला पाचारण केले आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडला संधी देण्यात आली आहे, तर जेम्स पॅटींसनला डच्चू देण्यात आला आहे.


ऑस्ट्रेलियाचा संघ - टीम पेन, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बँक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हीस हेड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाने 12 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात फिरकीपटून मोईन अलीला डच्चू देण्यात आला आहे. अलीच्या जागी इंग्लंड संघाड डावखुरा फिरकीपटू जॅक लीचचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत अलीला फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागात अपयश आले होते. त्यानं फलंदाजीत 0 व 4 धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत दोन्ही डावांत मिळून 42 षटकांत 172 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.


इंग्लंडचा संघ - जो रूट ( कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स. 
 

Web Title: BREAKING: Australia's 12-man squad for the 2nd Ashes Test; Josh Hazlewood to replace James Pattinson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.