अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियन संघाने अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर केला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीतून मालिका बरोबरीत सोडवण्याचा निर्धार यजमान इंग्लंडने केला आहे. पण, त्यांच्या या मनसुब्याला धक्का देण्याची तयारी ऑसींनी केली आहे. त्यांनी दुसऱ्या कसोटीसाठी संघात प्रमुख गोलंदाजाला पाचारण केले आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडला संधी देण्यात आली आहे, तर जेम्स पॅटींसनला डच्चू देण्यात आला आहे.
दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाने 12 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात फिरकीपटून मोईन अलीला डच्चू देण्यात आला आहे. अलीच्या जागी इंग्लंड संघाड डावखुरा फिरकीपटू जॅक लीचचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत अलीला फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागात अपयश आले होते. त्यानं फलंदाजीत 0 व 4 धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत दोन्ही डावांत मिळून 42 षटकांत 172 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.