Breaking : बरंच काही बरळून गेल्यानंतर चेतन शर्मांचा अखेर राजीनामा; जय शाह यांच्याकडे पाठवलं पत्र

BCCI chief selector Chetan Sharma resigns  - भारतीयय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक विधानं केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:01 AM2023-02-17T11:01:52+5:302023-02-17T11:02:04+5:30

whatsapp join usJoin us
Breaking : BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it: ANI  | Breaking : बरंच काही बरळून गेल्यानंतर चेतन शर्मांचा अखेर राजीनामा; जय शाह यांच्याकडे पाठवलं पत्र

Breaking : बरंच काही बरळून गेल्यानंतर चेतन शर्मांचा अखेर राजीनामा; जय शाह यांच्याकडे पाठवलं पत्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI chief selector Chetan Sharma resigns  - भारतीयय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक विधानं केली. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये आणि BCCI मध्ये एकच गोंधळ माजला होता. चेतन शर्मा यांचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणे अटळ होते. पण, त्यापूर्वीच चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला. बीसीसीआय सचिव जय शर्मा यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला असून तो त्यांनी मान्य केला आहे. ANI ने हे वृत्त दिले आहे. 

विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. जसप्रीत बुमराहची दुखापत, हार्दिक पांड्याचे करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली वक्तव्ये ऐकून भारतीय क्रिकेटरसिकांच्या पायाखालची जमीन सरकली. हे स्टिंग डिसेंबर महिन्यात झाले, असे म्हटले जात आहे. यावेळी चेतन निवड समिती प्रमुख नव्हते. पहिल्या टर्मनंतर त्यांची उचलबांगडी झाली होती. नंतर ९ जानेवारीला त्यांची या पदावर फेरनिवड झाली. मधल्या काळात त्यांनी बोर्ड आणि खेळाडूंबाबत इतक्या आतल्या गोष्टी का बरळल्या असाव्यात?  

चेतन यांची धक्कादायक वक्तव्ये...

  •  खेळाडू ८० ते ८५ टक्के फिट झाल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी इंजेक्शन घेतात.
  • जसप्रीत बुमराहचे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करण्यावरून संघ व्यवस्थापनाशी मतभेद होते. बुमराहला अजूनही संघात संधी मिळालेली नाही.
  • विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात भांडण झाले होते. गांगुलीमुळे विराटला कर्णधारपद गमवावे लागले.
  • इशान किशन याच्या द्विशतकी खेळीमुळे संजू सॅमसन सारख्यांना संघात स्थान नाही. संघातून स्थान गमावण्याच्या भीतीपोटी इंजेक्शनचा वापर करीत खेळाडू स्वत:ला फिट ठेवतात.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Breaking : BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it: ANI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.