India vs England Test : चेन्नईतील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवलेल्या टीम इंडियानं उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज संघ जाहीर केला. BCCI उर्वरित कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami) नावाचा विचार करेल अशी अपेक्षा होती, परंतु शमी व नवदीप सैनी यांना विश्रांती देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या या संघात शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) याचे नाव वगळण्यात आले आहे. त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज केलं गेलं आहे आणि त्याच्या जागी उमेश यादव ( Umesh Yadav) याचे नाव जाहीर केलं गेलं आहे. परंतु, उमेशला फिटनेस टेस्टमध्ये पास व्हावं लागेल. पहिली कसोटी खेळणाऱ्या शाहबाज नदीम यालाही रिलीज केलं आहे. Indian Team for the last 2 Test against England. IPL Auction 2021 : चेन्नईत होणार २९२ खेळाडूंचा लिलाव, जाणून घ्या तारीख, वेळ, संघाची यादी अन् सर्वकाही
नेट बॉलर्स - अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर्स, कृष्णप्पा गोवथम, सौरभ कुमार
राखीव खेळाडू - केएस भरत, राहुल चहर
भारतीय संघ ( TeamIndia for last Two Tests against England announced)
टीम इंडिया - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
World Test Championship final scenariosदुसऱ्या कसोटीती विजयानंतर टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली, तर इंग्लंडची पुन्हा चौथ्या स्थानी घसरण झाली. भारताच्या खात्यात ४६० गुण ( ६९.७ %) आहेत, इंग्लंडच्या खात्यात ४४२ गुण ( ६७.० %) आहेत. जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. ३-१ असा विजयच त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून देऊ शकतो. भारतानं ही मालिका जिंकल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल. पण ही मालिका २-२ किंवा १-१ अशा बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल.