Join us  

Breaking : नव्या लीगमधून ख्रिस गेल, लसिथ मलिंगा OUT, फ्रँचायझींनी दाखवला ठेंगा

मलिंगा, रबाडा व गेल हे अनसोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 9:58 AM

Open in App

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कुटणारा ख्रिस गेल आणि भेदक मारा करणारा लसिथ मलिंगा यांना इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नव्या 100 लीगमध्ये ( 100-100 चेंडूंचा सामना ) ठेंगा मिळाला आहे. एकाही फ्रँचायझींनी गेल व मलिंगासाठी बोली लावली नाही. त्यामुळे या दोन दिग्गजांना 100 लीगच्या पहिल्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली नाही. 

या दोघांसाठी जळवपास 125000 डॉलर इतकी बेस प्राईज ठेवण्यात आली होती. याच बेस प्राईज गटात मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कागिसो रबाडा यांचाही समावेश होता. स्टार्क आणि स्मिथ यांना वेल्स फायर, वॉर्नरला साऊथर्न ब्रेव्ह यांनी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगा, रबाडा व गेल हे अनसोल्ड राहिले. ट्रेंट रॉकेट्स संघाने ट्वेंटी-20 क्रमवारीतील अव्वल गोलंदाज रशीद खानला आपल्या चमूत दाखल करून घेतले. 

त्यांच्यासह आंद्रे रसेल ( साऊथर्न ब्रेव्ह), अॅरोन फिंच, मुजीब उर रहमान ( नॉर्थन सुपरचार्जर्स), सुनील नरीन ( ओव्हल इनव्हिजीबल), इम्रान ताहीर, डेन विलास ( मँचेस्टर ओरिजिनल्स), ग्लेन मॅक्सवेल ( लंडन स्पिरीट) आणि लिएम लिव्हिंगस्टोन ( बर्मिंगहॅम फोनिक्स) हेही या लीगमध्ये खेळणार आहेत.

यांच्याशिवाय या लीगमध्ये संदीप लामिछाने ( ओव्हल इनव्हिजिबल), मोहम्मद नबी, मोहम्मद आमीर ( लंडन स्पिरिट), नॅथन कोल्टर नायल ( ट्रेंट रॉकेट्स) हेही दिसतील. ट्वेटी-20 क्रमावारीतील अव्वल फलंदाज बाबर आझमलाही कोणी वाली मिळाला नाही. त्याशिवाय किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, क्विंटन डी कॉक आणि तमीम इक्बाल यांनाही कोणी आपल्या ताफ्यात घेतले नाही.

पुरुषांप्रमाणे महिलांचीही 100 लीग होणार आहे. महिलांच्या लीगमध्ये सोफी डेव्हीन ( बर्मिंगहॅम फोनिक्स), टॅमी बीमोंट ( लंडन स्पीरिट), लिझली ली ( मँचेस्टर ओरिजिनल्स), अॅलिसा हिली ( नॉर्थन सुपरचार्जर्स), डेन व्हॅन निएकर्क ( ओव्हल इनव्हिजिबल्स), सुझी बेट्स ( साऊथर्न ब्रेव्ह), सोफि मोलिनोक्स ( ट्रेंट रॉकेट्स) आणि मेग लॅनिंग ( वेल्स फायर) या दिग्गज खेळाडू दिसतील. 

टॅग्स :ख्रिस गेललसिथ मलिंगा