T20 World Cup Final : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( New Zealand vs Australia) यांच्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. अवघ्या दहा मिनिटांत या सामन्याची नाणेफेक होणे अपेक्षित आहे, परंतु हा सामना सुरू होण्यापूर्वी दुबईलाभूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सामन्यावर होईल का?, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. रविवारी इराणमध्ये ६.२ Magnitude चा भुकंप झाला आणि त्याचे हादरे दुबई व अबुधाबीलाही बसले. सायंकाळी ४ वाजता हा भुकंप झाला.
'' ६.२ Magnitude च्या भुकंपाची नोंद दक्षिण इराण येथे सायंकाळी ४.०७च्या सुमारास नोंदवली गेली,''अशी माहिती National Meteorology Centre ने दिली. भुकंपाच्या हादऱ्यांमुळे दुबईत लोकं घाबरली आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतील होती. पण, या भुकंपाचा सामन्यावर कोणताच परिणाम होणार नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल ही ठरलेल्या वेळेनुसारच होईल.
दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंचा प्रवासऑस्ट्रेलिया ५ विकेट्स राखून वि. वि. दक्षिण आफ्रिका८ विकेट्स राखून वि. वि. बांगलादेश७ विकेट्स राखून वि. वि. श्रीलंका८ विकेट्स राखून वि. वि. वेस्ट इंडिज८ विकेट्सने पराभूत. वि. इंग्लंड५ विकेट्स राखून वि. वि. पाकिस्तान
न्यूझीलंड५ विकेट्सनं पराभूत वि. पाकिस्तान८ विकेट्स राखून वि. वि. भारत५२ धावांनी विजयी वि. नामिबिया८ विकेट्स राखून वि. वि. अफगाणिस्तान१६ धावांनी वि. वि. स्कॉटलंड५ विकेट्स राखून वि. वि. इंग्लंड