इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २००६ मध्ये त्याने इंग्लंडच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्याआधी त्याने आयर्लंड संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. ३५ वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा वन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने २२५ वन डे सामन्यांत १३ शतकांसह ६९५७ धावा केल्या आहेत. एकूण वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७७०१ धावा आहेत आणि १४ शतकं आहेत. मॉर्गनच्या या निर्णयामुळे भारताविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व दुसऱ्याकडे सोपवले जाईल.
मॉर्गनने १२६ सामन्यांत इंग्लंडने नेतृत्व केले आणि त्यापैकी ७६ मध्ये विजय मिळला. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद हा त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही त्याने ११५ सामन्यांत १३६.१८च्या स्ट्राईक रेटने २४५८ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने ७२ सामन्यांत नेतृत्व करताना ४२ विजय मिळवले आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत दुसरा कर्णधार मिळणार आहे. जोस बटलरकडे ही जबाबादरी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इयॉन मॉर्गनने म्हटले की, नीट विचारविनिमय केल्यानंतर, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ प्रभावाने माझी निवृत्ती जाहीर करण्यासाठी येथे आलो आहे. हा निर्णय घेणे साहजिकच माझ्यासाठी सोपं नव्हते, परंतु हिच ती योग्य वेळ असल्याचे मला वाटते. मला दोन वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली, याबाबत स्वतःला नशिबवान समजतो. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे भविष्य उज्ज्वल आहे.
Web Title: BREAKING: England skipper Eoin Morgan has announced his retirement from international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.