Join us  

BREAKING : Team India चा श्रीलंका दौरा; BCCI ने अचानक वेळापत्रक बदलले, नवीन तारखा समोर

IND vs SL T20 ODI Series Schedule : बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 6:23 PM

Open in App

IND vs SL T20 ODI Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ आगामी काळात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी अलीकडेच बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले होते. पण, आता बीसीसीआयने वेळापत्रकात मोठा बदल केला असून नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार सलामीचा सामना २७ जुलै रोजी खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-२० मालिका २७ जुलैपासून सुरू होणार आहे, तर वन-डे मालिका २ ऑगस्टपासून खेळण्यात येणार आहे. ट्वेंटी-२० मालिका पल्लेकल येथे खेळवली जाईल, तर वन डे मालिकेतील तीनही सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली परीक्षा असणार आहे.

ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -

  1. पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.
  2. दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.
  3. तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.

वन डे मालिकेचे वेळापत्रक - 

  1. पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
  2. दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
  3. तिसरा सामना - ७  ऑगस्ट - दुपारी २.३० वा.

भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वीच यजमान संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याने कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी श्रीलंकेला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. श्रीलंकेचा संघही नव्या मुख्य प्रशिक्षकासह मैदानात उतरणार आहे. अनुभवी माजी सलामीवीर खेळाडू सनथ जयसूर्या याला या मालिकेसाठी श्रीलंकेचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. खरे तर श्रीलंकेचा संघ पूर्वीसारखा तुल्यबळ राहिलेला नाही, पण आशिया चषकात त्यांनी केलेली कामगिरी साऱ्यांच्याच लक्षात आहे. टीम इंडियाने शेवटचा श्रीलंकेचा दौरा २०२१ मध्ये केला होता. त्यावेळी भारताने वन डे मालिका जिंकली होती, पण ट्वेंटी-२० मालिकेत भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय