इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं कसोटी मालिकेत यजमानांचे वस्त्रहरण केले आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहली अँड कंपनीचा आत्मविश्वास पाहता पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला ते डोकं वर काढू देणार नाहीत, हे निश्चित आहे. आता कसोटीनंतर टीम इंडिया वन डे व ट्वेंटी-२० मालिकेतही यजमान इंग्लंडला त्यांच्याच घरी लोळवण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) बुधवारी तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
ECBनं २०२२च्या सत्रातील इंग्लंडचे वेळापत्रक आज जाहीर केले. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून या सत्राची सुरूवात होणार आहे. त्यानंतर भारताविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० मालिका असे वेळात्रक आहे. इंग्लंडचा संघ २ जून ते २७ जून २०२२ या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( ICC World Test Championship 2021-23 ) न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळतील. हे सामने लॉर्ड्स, ट्रेंट ब्रिज व हेडिंग्ली येथे होतील.
या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सामना करेल. १ जुलै ते १४ जुलै या कालावधीत टीम इंडिया येथे तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर १९ जुलै ते १२ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे, तीन ट्वेंटी-२० व तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल.
जाणून घ्या भारत-इंग्लंड मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक! ( England Men v India Series schedule, 2022)
ट्वेंटी-२० मालिका
१ जुलै २०२२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
३ जुलै २०२२ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंग्हॅम
६ जुलै २०२२ - एजीस बाऊल, साऊदहॅम्प्टन
वन डे मालिका
९ जुलै २०२२ - एडबस्टन, बर्मिंगहॅम
१२ जुलै २०२२ - ओव्हल, लंडन
१४ जुलै २०२२ - लॉर्ड्स, लंडन
Web Title: BREAKING: India will be touring England to play three ODIs and three T20Is next summer, know full schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.