Join us  

India Tour to England : कसोटीत वस्त्रहरण केलं, आता वन डे व ट्वेंटी-२०त दाखवणार दम; जाणून घ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

विराट कोहली अँड कंपनीचा आत्मविश्वास पाहता पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला ते डोकं वर काढू देणार नाहीत, हे निश्चित आहे. आता कसोटीनंतर टीम इंडिया वन डे व ट्वेंटी-२० मालिकेतही यजमान इंग्लंडला त्यांच्याच घरी लोळवण्यासाठी सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 3:53 PM

Open in App

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियानं कसोटी मालिकेत यजमानांचे वस्त्रहरण केले आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं २-१ अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहली अँड कंपनीचा आत्मविश्वास पाहता पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला ते डोकं वर काढू देणार नाहीत, हे निश्चित आहे. आता कसोटीनंतर टीम इंडिया वन डे व ट्वेंटी-२० मालिकेतही यजमान इंग्लंडला त्यांच्याच घरी लोळवण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) बुधवारी तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे ७ नवीन नियम; तुम्हाला माहीत आहेत का?

ECBनं २०२२च्या सत्रातील इंग्लंडचे वेळापत्रक आज जाहीर केले. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून या सत्राची सुरूवात होणार आहे. त्यानंतर भारताविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० मालिका असे वेळात्रक आहे. इंग्लंडचा संघ २ जून ते २७ जून २०२२ या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( ICC World Test Championship 2021-23 ) न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळतील. हे सामने लॉर्ड्स, ट्रेंट ब्रिज व हेडिंग्ली येथे होतील.  

या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सामना करेल. १ जुलै ते १४ जुलै या कालावधीत टीम इंडिया येथे तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर १९ जुलै ते १२ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन डे, तीन ट्वेंटी-२० व  तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल.    जाणून घ्या भारत-इंग्लंड मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक! ( England Men v India Series schedule, 2022) ट्वेंटी-२० मालिका१ जुलै २०२२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर३ जुलै २०२२ - ट्रेंट ब्रिज, नॉटिंग्हॅम६ जुलै २०२२ - एजीस बाऊल, साऊदहॅम्प्टन वन डे मालिका  ९ जुलै २०२२ - एडबस्टन, बर्मिंगहॅम१२ जुलै २०२२ - ओव्हल, लंडन१४ जुलै २०२२ - लॉर्ड्स, लंडन 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडटी-20 क्रिकेट
Open in App