Join us  

Breaking: टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक डे-नाईट सामना खेळणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 11:31 AM

Open in App

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. ६-७ वर्षांनंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे. पण, यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांना फार प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी मोठी घोषणा केली. भारतीय महिला संघ सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तेथे ते ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. २००६नंतर भारतीय महिला व ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात कसोटी सामना होणार आहे. बीसीसीआय पुरुष क्रिकेटपटूंना देते वर्षाला ७ कोटी, तर महिला खेळाडूंना ५० लाख!

महिला क्रिकेटमधील हा दुसराच डे नाईट कसोटी सामना असेल. याआधी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात २०१७मध्ये डे नाईट कसोटी सामना होणार आहे. तो सामना अनिर्णीत राहिला होता. १५ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा हा कसोटी सामना वाका ग्राऊंडवर ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियन महिला संघ वाका ग्राऊंडवर ( १९५८, १९८४ व २०१४) तीनच कसोटी सामने खेळले आहेत आणि तेही प्रथमच येथे डे नाईट कसोटी खेळणार आहेत.  कोरोनामुळे मोठी स्पर्धा रद्द झाली, भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा लांबली!  या दौऱ्यावर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिकाही होईल. हे सामने नॉर्थ सिडनी ओव्हल व मेलबर्न येथे होतील. २०२०च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलनंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.      

संपूर्ण वेळापत्रक ( Commonwealth Bank Women's Series v India)

  • १९ सप्टेंबर - पहिला वन डे - नॉर्थ सिडनी ( दिवस-रात्र)
  • २२ सप्टेंबर - दुसरा वन डे - जंक्शन ओव्हल 
  • २४ सप्टेंबर - तिसरा वन डे - जंक्शन ओव्हल ( दिवस-रात्र)  
  • ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर - कसोटी सामना ( दिवस-रात्र) 
  • ७ ऑक्टोबर - पहिली ट्वेंटी-२०, नॉर्थ सिडनी ओव्हल
  • ९ ऑक्टोबर - दुसरी ट्वेंटी-२०,  नॉर्थ सिडनी ओव्हल
  • ११ ऑक्टोबर - तिसरी ट्वेंटी-२०, नॉर्थ सिडनी ओव्हल
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया