मुंबई : देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या होत्या. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी अचानक आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. आयपीएलच्या 12 व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल. लोकसभा निवडणुक लक्षात घेता आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचेहंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते.
सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आयपीएलमधील 10 महागडे खेळाडू, तुम्हाला माहित आहेत का?
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते.
आयपीएलमधील दहा महागडे खेळाडू
युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)
बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)
युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)
बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)
जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)
गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)
लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)
रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)
Web Title: BREAKING: The IPL 2019 schedule for the first two weeks has been announced
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.