इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. २०२०त यूएईत आयपीएलचे सामने खेळवल्यानंतर यंदा ही लीग भारतातच खेळवण्याच्या हालचाली BCCIनं सुरु केल्या आहेत. २०२१च्या आयपीएलसाठी फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात थोडीफार बदल करण्याची संधी BCCIनं दिली आहे. त्यानुसार सर्व फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यातील काही खेळाडूंना रिलीज केले आणि नव्या खेळाडूंसाठी जागा रिक्त केली आहे. रिटेशनमध्ये सर्व फ्रँचायझींनी मिळून १३९ खेळाडूंना कायम राखले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले. BCCIनं बुधवारी IPL 2021च्या ऑक्शनची तारीख व ठिकाण जाहीर केलं. IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्थानिक मैदानावर आयपीएल आयोजनाचे प्रयत्न केले जातील,असे काही दिवसांपूर्वी वारंवार सांगितले होते. कोरोनामुळे आयपीएल २०२० यूएईत झाले होते. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिकेचे भारतात आयोजन होणार असल्याने आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला आहे. सर्व संघांना खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख २० जानेवारी देण्यात आली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात (ट्रेडिंग विंडो)जाता येणार आहे. बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
आता आयपीएल २०२१साठीचे लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणार असल्याची घोषणा BCCIनं केली.
Web Title: Breaking : IPL 2021 auction will be held in Chennai on February 18th
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.