IPL has been moved to UAE for this season : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली आणि त्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनावरही चर्चा करण्यात आली आणि बीसीसीआयनं यासाठी आयसीसीकडे थोडा वेळ मागितला आहे. ( The BCCI has decided to seek more time from the ICC to stage the T20 WC in India.)
सूत्रांनी ANI ला सांगितले की, बीसीसीआयनं परदेशी क्रिकेट संघटनेसोबत खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळतील, परंतु न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आणखी एक महिन्याची वाट पाहणार आहे. '' आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामने १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत यूएईत होणार असल्याची चर्चा आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत. त्यात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( Caribbean Premier League ) पर्वाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१च्या पहिल्या १० दिवसांत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागावरही संकट आलं आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात होईल. भारत व इंग्लंडचे खेळाडू थेट लंडनहून यूएईत दाखल होतील. ते एका बायो-बबलमधून येणार असल्यानं त्यांना यूएईत क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण, अन्य खेळाडूंच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही.
- इंग्लंड - बांगलादेश दौरा ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०), पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्याची मालिका
- कोणते खेळाडू मुकणार - मोईन अली, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, लायम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस वोक्स, जेसन रॉय, सॅम बिलिंग, डेविड मलान, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेअरस्टो.
- न्यूझीलंड - न्यूझीलंड यूएईत पाकिस्तानविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार
- कोणते खेळाडू मुकणार - केन विलियम्सन, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, टीम सेईफर्ट, फिन अॅलन, कायले जेमिन्सन
- ऑस्ट्रेलिया - श्रीलंकेविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन
- कोणते खेळाडू मुकणार - ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, झाय रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस, स्टीव स्मिथ, रिले मेरेडीथ, नॅथन कोल्टर नील. केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, डॅन ख्रिस्टियन, ख्रिस लीन, अँड्य्रू टाय, बेन कटींग, जेसन बेहरेनडॉर्फ, मोईसेस हेन्रीक्स, अॅडन झम्पा.
- दक्षिण आफ्रिका - नेदरलँड्स यांच्याविरुद्धची मालिका, त्यानंतर काही खेळाडू CPL 2021त खेळणार
- कोणते खेळाडू मुकणार - क्विंटन डी कॉक, फॅफ ड्यू प्लेसि, कागिसो रबाडा, इम्रान ताहीर, अॅनरिच नॉर्ट्जे, ख्रिस मॉरिस, डेव्हिल मिलर, लुंगी एनगिडी, मार्को जॅन्सेन
- बांगलादेश - शाकिब अल हसन, मुस्ताफिजुर रहमाना
- वेस्ट इंडिज - किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शिमरोन हेटमायर, सुनील नरीन, फॅबियन अॅलेन, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर