इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी BCCI प्रत्येक फ्रँचायझीला नेमक्या किती खेळाडूंना संघात कायम राखण्याची संधी देतात याची उत्सुकता आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये सर्व फ्रँचायझीमध्ये बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळेल. पण, त्याआधी ILT20 च्या तिसऱ्या सीझनचे काउंटडाउन सुरू झाले आहे आणि या लीगममध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI Emirates संघाने त्यांच्या रिटेन ( संघात कायम राखलेल्या) केलेल्या व रिलीज ( करारमुक्त ) केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
२०२४ च्या चॅम्पियन्स संघाने १४ खेळाडूंना पुढील हंगामापूर्वी कायम ठेवले आहे. निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आदी स्टार खेळाडूंचा रिटेन लिस्टमध्ये सहभाग आहे. लीगच्या नियमांनुसार, फ्रँचायझींना जास्तीत जास्त दोन अमेरिकेच्या खेळाडूंना कायम ठेवण्याचा पर्याय होता. मागील ILT20 सीझनमधील तरुण खेळाडू मोहम्मद वसीम आणि मुहम्मद रोहिद यांनी प्राभावी कामगिरी केली होती. ILT20 चा तिसरा सीझन ११ जानेवारी २०२५ रोजी सुरू होणार आहे, अंतिम सामना ९ फेब्रुवारी २०२५ रोजी खेळवला जाणार आहे. ़
कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी:
- किरॉन पोलार्ड
- ड्वेन ब्राव्हो
- निकोलस पूरन
- आंद्रे फ्लेचर
- जॉर्डन थॉम्पसन
- अकेल होसीन
- कुसल परेरा
- व्यासकांत विजयकांत
- वकार सलामखेल
- नॉस्टुश केंजिगे
- फजलहक फारुकी
- मुहम्मद वसीम
- मुहम्मद रोहिद
- डॅनियल मौसली
रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी:
- अंबाती रायुडू
- आसिफ खान
- कोरी अँडरसन
- भानुका राजपक्षे
- ख्रिस्तोफर बेंजामिन
- मॅकेनी क्लार्क
- मोनांक पटेल
- ओडियन स्मिथ
- ट्रेंट बोल्ट
- रीस टोपली
- टिम डेव्हिड
- विल स्मीड
- जहूर खान