India vs South Africa T20I : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पण, या सामन्याला सुरूवात होण्याआधी भारताला दोन मोठे धक्के बसले आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. रिषभ पंत ( Rishabh Pant) या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर हार्दिक पांड्याला उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नेट्समध्ये फलंदाजी करताना कुलदीपच्या हाताला दुखापत झाली.
भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि त्यांनी अफगाणिस्ता व रोमानिया यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानला नमवून टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्डचा पाया रचला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 12 पैकी 9 सामने जिंकले आणि आता लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विश्व विक्रमाची नोंद होण्याची संधी आहे.
भारताचा संघ - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत ( कर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या ( उप कर्णधार) , वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक
दक्षिण आफ्रिकेचा संध - टेम्बा वबुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेड्रीक्स, हेनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेज शम्सी, त्रिस्तान स्तुब्ब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, मार्को येनसेन
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्लीदुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटकतिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाकचौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोटपाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू