इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडण्यात येणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. Day matches starts at 3.30 pm and night matches starts at 7.30 pm in IPL 2021
आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत.
कोरोनाच्या शिरकाव झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यानंतर या लीगचे उर्वरित 31 सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह येथे खेळवण्याचा निर्णय झाला. 15 ऑक्टोबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे, तर 10 ऑक्टोबरला पहिला क्वालिफायर, 11 ऑक्टोबरला एलिमिनेटर आणि 13 ऑक्टोबरला दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे.
Full Schedule19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून20 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून21 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून24 सप्टेंबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून25 सप्टेंबर - सनयारझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून30 सप्टेंबर - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून1 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चँलेंजर्स बँगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून3 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून6 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून7 ऑक्टोबर - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून7 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून10 ऑक्टोबर - क्वालिफायर, सायं. 7.30 वाजल्यापासून11 ऑक्टोबर - एलिमिनेटर, सायं. 7.30 वाजल्यापासून13 ऑक्टोबर - क्वालिफायर 2, सायं. 7.30 वाजल्यापासून15 ऑक्टोबर- फायनल, सायं. 7.30 वाजल्यापासून