पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) ने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाकडून खेळणाऱ्या बाबरने सहावी धाव घेताच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा त्याने ओलांडला. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याने २८५ इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त दहा हजार धावा केल्या होत्या. बाबरने हा टप्पा २७१ इनिंग्जमध्ये पार केला. विराट कोहलीने २९९ इनिंग्ज आणि डेव्हिड वॉर्नरने ३०३ इनिंग्जमध्ये ट्वेंटी-२०त १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
कराची किंगविरुद्धच्या आजच्या लढतीपूर्वी बाबरने २७० इनिंग्जमध्ये ९९९४ धावा केल्या होत्या आणि त्याच्या नावावर १० शतकं व ८३ अर्धशतकं नोंदवली गेली आहेत. आज त्याने सहावी धाव घेऊन ट्वेंटी-२०त १० हजार धावा पूर्ण केल्या.
ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- ख्रिस गेल ( २००५-२०२२) - ४६३ सामने, १४५६२ धावा, २२ शतकं व ८८ अर्धशतकं
- शोएब मलिक ( २००५ -२०२४) - ४९४ सामने, १३१५९ धावा, ८३ अर्धशतकं
- किरॉन पोलार्ड ( २००६-२०२४) - ६५२ सामने, १२६८९ धावा, १ शतक व ५८ अर्धशतकं
- अॅलेक्स हेल्स ( २००९-२०२४) - ४४१ सामने, १२२०९ धावा, ६ शतकं व ७८ अर्धशतकं
- डेव्हिड वॉर्नर ( २००७-२०२४) - ३६९ सामने, १२०३३ धावा, ८ शतकं व १०१ अर्धशतकं
- विराट कोहली ( २००७-२०२४) - ३७६ सामने, ११९९४ धावा, ८ शतकं व ९१ अर्धशतकं
- आरोन फिंच ( २००९-२०२४) - ३८७ सामने, ११४५८ धावा, ८ शतकं व ७७ अर्धशतकं
- रोहित शर्मा ( २००७ - २०२४) - ४२६ सामने, १११५६ धावा, ७ शतकं व ७४ अर्धशतकं
- जोस बटलर ( २००९-२०२४) - ४०३ सामने, १११४६ धावा, ६ शतकं व ८० अर्धशतकं
- कॉलिन मुनरो ( २०१०-२०२४) - ४२० सामने, १०६४८ धावा, ५ शतकं व ६४ अर्धशतकं
- जो विन्स ( २०१०-२०२४) - ३७२ सामने, १०२४२ धावा, ५ शतकं व ६५ अर्धशतकं
- डेव्हिड मिलर ( २००८-२०२४) - ४६६ सामने, १००१९ धावा, ४ शतकं व ४५ अर्धशतकं.