लाहोर : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. पण, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने ही स्पर्धा गाजवली. त्यानं 8 सामन्यांत 17 विकेट्स घेत आपला दबदबा दाखवून दिला. पण, संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. त्याच मोहम्मद आमीरनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहली अन् पाकिस्तानचा आमीर एकाच संघातून खेळणारबांगलादेश येथे पुढील वर्षी आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे दोन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. 18 व 21 मार्च 2020 या दिवशी मिरपूर येथील शेरे बांग्ला स्टेडियमवर हे सामने होतील. या सामन्याच्या निमित्तानं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर एकाच संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. आशियाई इलेव्हन संघाचे प्रतिनिधित्व हे खेळाडू करतील.
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. शेख मुजीबुर रहमान हे बांग्लादेशचे पहिले राष्ट्रपती होते आणि दुरसे प्रधानमंत्री होते. ऑगस्ट 1975 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हुसैन पापोन यांनी या सामन्यांसाठी जगातील दिग्गज खेळाडू असतील, असे वचन दिले आहे.