Babar Azam has stepped down as Pakistan captain in all formats भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam ) याने कर्णधारपद सोडले. त्याने पाकिस्तानच्या सर्व फॉरमॅटच्या संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला ९ सामन्यांत ४ विजयांवर समाधान मानावे लागले. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला यजमान भारताने पराभवाची चव चाखवली. त्यानंतर त्यांची गाडी घसरली. कर्णधार बाबर आजमचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय बनलेला दिसला. त्यात त्याचे कर्णधारपद जाणार हे निश्चित होते आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्णय घेण्याआधीच त्याने स्वतः कर्णधारपदावरून पायउतार होणे योग्य समजले.
बाबरला वर्ल्ड कपच्या ९ सामन्यांत ४ अर्धशतकांसह ३२० धावा करता आल्या. त्याने लिहिले की, ''२०१९मध्ये पीसीबीकडून मला फोन केला होता आणि तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. मागील चार वर्षांत मी खूप चढ उतार पाहिले, परंतु मी नेहमीच संघाच्या हिताचा आणि देशाची मान ताठ ठेवण्याचा प्रयत्न केला. वन डे क्रिकेटमधील नंबर १ हे सर्व सहकाऱ्यांच्या व व्यवस्थापकांच्या योगदानाचे फलित आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचे मी आभार मानतो, ते नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.''
''आज मी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देतोय. हा निर्णय अवघड होता, परंतु हिच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. खेळाडू म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व मी करणार आहे. नव्या कर्णधाराला माझा पूर्ण पाठींबा असेल आणि माझा अनुभव संघाच्या हितासाठी कामी आणेन. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मी आभार मानतो,''असेही त्याने लिहिले.
Web Title: BREAKING NEWS: Babar Azam has stepped down as Pakistan captain in all formats
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.