नवी दिल्ली : भारतीय संघाला सध्याच्या घडीला मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे समजत आहे. या दुखापतीमुळे हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. पण आता ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. कारण आता त्याला या दुखापतीवर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे आणि ही शस्त्रक्रीया इंग्लंडमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.
हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. ही दुखापत त्यावेळीही गंभीर होती. कारण त्यावेळी हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक दुखापतीमधून सावरला होता. लंडनमध्ये झालेल्या विश्वचषकातही हार्दिक खेळला होता. पण सधाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिकने माघार घेतली होती. पण आता त्याच्या दुखापतींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हार्दिकला आता शस्त्रक्रीया करावी लागणार आहे आणि ही शस्त्रक्रीया भारतात होणार नसल्याचेही समजत आहे.
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
Web Title: Breaking News: Bad news for Indian team; hardik pandya's injury serious
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.