इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तयारीला लागले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका, असा हा दौरा असणार आहे. सप्टेंबरपर्यंत हा दौरा चालणार असला तरी जुलै महिन्यात भारताच्या राखीव फळीचा संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भारताचा माजी दिग्गज राहुल द्रविड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ANIला सांगितले की राहुल द्रविडचं नाव जवळपास निश्चित झाले आहे. Breaking News : A BCCI official said Rahul Dravid will be the head coach of team India for the Sri Lankan tour
भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. या कालावधीत विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर संघाचे नेतृत्व कोण करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. संघातील अनुभवी शिखर धवन याचे नाव आघाडीवर असले तरी पृथ्वी शॉ याच्याकडेही नेतृत्व सोपवले जाऊ शकते. राहुल द्रविडकडे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडू घडले आहेत आणि त्याच खेळाडूंसह टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळेच द्रविडची निवड केली गेली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन, पृथ्वी, शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलिल अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आदी खेळाडू उपलब्ध आहेत. शिखर धवन करणार टीम इंडियाचे नेतृत्व?; २० जणांची ही दुसरी फळी 'विराट'सेनेलाही देऊ शकते टक्कर!
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ANI सांगितले की, टीम इंडिया आणि प्रशिक्षक लंडन दौऱ्यावर असणार आहेत. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंचा सर्वोत्तम संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. या युवा खेळाडूंसोबत द्रविडनं आधीच काम केलं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना त्याच्याशी संवाद साधणे सोपं जाईल.''
कसा असेल श्रीलंका दौरा?
वन डे मालिका - १३ जुलै, १६ जुलै व १९ जुलै
ट्वेंटी-२० मालिका - २२ जुलै, २४ जुलै व २७ जुलै
सर्व सामने कोलंबो येथे खेळवण्यात येतील.
Web Title: Breaking News : A BCCI official said Rahul Dravid will be the head coach of team India for the Sri Lankan tour
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.