ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत. भारतीय संघाला यूएई नंतर ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप स्पर्धेत अपयश आले. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्स राखून भारतावर दणदणीत विजयाची नोंद केली.
''संघ निवड करताना अनेक चुकीचे निर्णय घेतले गेला. आता नव्याने सुरुवात करायची आहे. निवड समितीतील काही सदस्यांचा कार्यकाळ संपायला आला आहे आणि नवीन सुरुवात करण्याचा आमचा विचार आहे. आम्हाल जे निकाल अपेक्षित होते ते मिळालेले नाही आणि जय शाह हे मेलबर्नवरून परतल्यानंतर आम्ही नवीन निवड समिती नेमण्याचा निर्णय घेतला,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने Inside Sport ला सांगितले.
हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार; BCCI लवकरच घोषणा करणार
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी होताना दिसतेय. रोहित शर्माचं वय पाहता त्याच्याकडे आता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यात BCCI कडून हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार असेल, असे संकेत मिळत आहेत. २०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी बीसीसीआय मर्यादित षटकांच्या या प्रकारात युवा खेळाडूंना पाहत आहे आणि त्यासाठी आतापासूनच त्यांनी कंबर कसली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेआधीच हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची अधिकृत घोषणा केली जाईल. रोहित शर्माकडे वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवले जाईल. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत रोहितकडे वन डे संघाचे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या सर्कलपर्यंत कसोटीचे नेतृत्व कायम असेल.
Web Title: Breaking NEWS : BCCI sacks Chetan Sharma-led senior national selection committee, invites applications for the position of National Selectors (Senior Men)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.