Join us  

Breaking News: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार! मोठ्या खेळाडूला RCBकडे सोपवले अन्.... 

मुंबई इंडियन्सचे फॅन ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, ती अखेर समोर आली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 7:57 PM

Open in App

मुंबई इंडियन्सचे फॅन ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, ती अखेर समोर आली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाला. २०१५मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा हार्दिक हा प्रमुख खेळाडू बनला होता. पण, २०२२मध्ये त्याने गुजरात टायटन्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनसीच्या पहिल्याच पर्वात त्याने गुजरात टायटन्सला जेतेपद पटकावून दिले आणि २०२३ मध्ये हा संघ उप विजेता ठरला होता. पण, हार्दिक व गुजरात फ्रँचायझी यांच्यात काहीतरी फिसकटल्याची चर्चा होती आणि त्याने मुंबई इंडियन्ससोबत चर्चा सुरू केली होती. 

कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ४०.७५ कोटीसनरायझर्स हैदराबाद - ३४ कोटीकोलकाता नाइट रायडर्स - ३२.७ कोटीचेन्नई सुपर किंग्स - ३१.४ कोटीपंजाब किंग्स - २९.१ कोटीदिल्ली कॅपिटल्स - २८.९५ कोटी मुंबई इंडियन्स - १५.२५ कोटीराजस्थान रॉयल्स - १४.५ कोटीलखनौ सुपर जायंट्स - १३.९ कोटीगुजरात टायटन्स - १३.८५ कोटी 

सायंकाळी ५.२५ मिनिटांनी गुजरात टायटन्सने जेव्हा रिटेन केलेल्या म्हणजेच संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यात हार्दिक पांड्याचे नाव दिसल्याने तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण, आज रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची संधी होती आणि ट्रेड विंडो १२ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. त्यामुळे पडद्यामागून वाटाघाटी सुरू होती आणि सायंकाळी ७.२५ वाजता मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यात डील झाली. हार्दिक मुंबई इंडियन्सकडे परत आला.

 हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडे  १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला ही डील करण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. ही रक्कम अद्याप कळलेली नाही. बीसीसीआय किंवा दोन्ही फ्रँचायाझींकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, क्रिक बजने हे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२३हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर