मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या दुखापतीने अजूनही गंभीर रुप धारण केले आहे. कारण येत्या काही महत्वाच्या मालिकांमध्ये पंड्याला खेळवण्याता भारतीय संघाला मानस होता. पण आता पंड्याची दुखापत अजूनही गंभीर असल्याचे समजत आहे. त्यामुळे पंड्याला मोठ्या मालिकेला मुकावे लागणार आहे.
पंड्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. पंड्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरु आहेत. पंड्याच्या पाठिच्या मणक्याला मोठा मार लागलेला आहे. त्यामुळे पंड्याच्या मणक्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रीयेसाठी पंड्याला आता लंडनला नेण्यात येणार आहे.
हार्दिकनं न्यूझीलंड दौऱ्याच्या मध्यंतरापर्यंत कमबॅक करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यापूर्वी हार्दिक म्हणाला होता की,''न्यूझीलंड मालिकेच्या मध्यंतरापर्यंत मी कमबॅक करेन. काही आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल आणि त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, हा माझा प्लान आहे. माझ्यासाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हा महत्त्वाचा आहे.