लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत निळ्या जर्सीनेच सर्व सामने खेळले आहेत. भारतासाठी निळी जर्सी लकी असल्याचेही काही जण म्हणतात. पण आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला निळ्या जर्सीने खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांचा सामना ३० जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करू शकते. आतापर्यंत या 'ऑरेंज जर्सी'बाबत बरीच चर्चा झाली. पण या 'ऑरेंज जर्सी'चा लूक नेमका कसा असेल, हे कोणालाही माहिती नव्हते. पण आज या 'ऑरेंज जर्सी'चे अनावरण करण्यात आले आणि तिचा पहिला लूक पाहायला मिळाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) होम-अवे फॉरमॅटनुसार भारतीय संघाला दुसरी जर्सी तयार ठेवण्यास सांगितले होते. या भगव्या जर्सीचा फर्स्ट लूक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडला सुट का?
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागेल. पण यावेळी भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.
आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत. पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला त्यांच्यी जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही रंगसंगती उलटी होऊ शकते. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचे हात ऑरेंज रंगाचे असतील, तर कॉलर निळ्या रंगाची असेल.
Web Title: Breaking News, ICC World Cup 2019: India's Orange Jersey unveiled, see first look
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.