Join us  

ना दुखापत, ना वैयक्तिक अडचण.. तरीही संजू सॅमसन आशिया चषक सोडून भारतात, 'हे' आहे कारण

उद्या भारत-पाक सामना असताना, अचानक संजूला माघारी पाठवण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 12:02 PM

Open in App

Asia Cup 2023 IND vs PAK, Sanju Samson leaves Team India Squad : भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आहे आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक (आशिया चषक-2023) च्या सुपर-4 सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. या दरम्यान, एका खेळाडूला मायदेशी पाठवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 10 सप्टेंबर रोजी हाय व्होल्टेज सामना होणार आहे. त्याआधी संजू सॅमसनला मायदेशी पाठवल्याने भारतीय चाहते काहीसे निराश झाले आहेत.

सामना कोलंबोमध्ये

कोणत्याही मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आता असेच वातावरण रविवारी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यापूर्वीच यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला घरी पाठवण्यात आले आहे. आशिया कपमध्ये संजूचा प्रवासी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. सुरुवातीच्या दोन सामन्यांत त्याला संघात संधी मिळाली नाही. आता त्याला भारतात पाठवण्यात आले आहे. वास्तविक, दुखापतीमुळे राहुल यापूर्वी संघासह श्रीलंकेला येऊ शकला नव्हता. आता तो संघात सामील झाला आहे. अशा परिस्थितीत सॅमसनला घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

BCCI च्या अधिकाऱ्याचा दुजोरा

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इनसाइडस्पोर्टने अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, 'केएल राहुल संघात सामील झाल्यानंतर आता संजू सॅमसनला मायदेशी पाठवण्यात आले आहे. सॅमसनला संघातून वगळण्यात आले आहे, कारण तो स्टँडबाय खेळाडू म्हणून संघासोबत प्रवास करत होता. आगामी विश्वचषकासाठीही सॅमसनला संघात संधी मिळालेली नाही.

पावसाची शक्यता

दरम्यान, १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे, ही दिलासादायक बाब आहे. या दोन्ही संघांमध्ये गटसाखळीतील शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सुपर-4 फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानसंजू सॅमसनलोकेश राहुल
Open in App