India vs Australia T20I series : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली गेली आणि याच संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार आहे. २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून भारतीय संघात पुनरागमन करत आहेत. त्यांच्यासह ट्वेंटी-२० मालिकेत मोहम्मद शमी, दीपक चहर यांचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. पण, कागांरूंचा सामना करण्यापूर्वी भारताच्या प्रमुख गोलंदाजाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आहे.
१० महिन्यांनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या शमीच्या मार्गात कोरोनाचे विघ्न आले. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो ऑसींविरुद्ध खेळणार नाही. भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मोहाली येथे आज दाखल झाले, परंतु शमी आला नाही. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि ऑसींविरुद्ध खेळणार नाही. २५ सप्टेंबरला ही मालिका संपतेय व २८ पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरु होणार आहे. तो कितपत सावरतो यावर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या सहभागाचा निर्णय घेतला जाईल. त्याला घरी ७ दिवस विलगिकरणात रहावे लागणार आहे. दोन कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच तो संघासोबत सराव करू शकेल. त्याच्या जागी उमेश यादव याचे नाव चर्चेत आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर व २५ सप्टेंबर- हैदराबाद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
द. आफ्रिकेविरुद्धचे वेळापत्रक - २८ सप्टेंबर- तिरुअनंतपूरम, २ ऑक्टोबर - गुवाहाटी व ४ ऑक्टोबर- इंदूर
Web Title: Breaking News: Indian fast bowler Mohammed Shami has tested positive for COVID19. He is out of the 3-match T20I series vs Australia, Umesh Yadav is replacing Shami for the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.