Join us  

BREAKING NEWS: जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट्स; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात बदल

India vs Sri Lanka : भारतीय संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:22 PM

Open in App

India vs Sri Lanka : भारतीय संघ आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा सामना करणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन भारतीय संघात BCCI बदल करू पाहत आहे. अशात आज प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट्स जय शाह यांनी दिले. दुखापतीमुळे जसप्रीत बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागले होते आणि चाहते त्याच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते.

आज बीसीसीआयच्या निवड समितीने जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचे जाहीर केले आणि श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेशही केला. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून तो पुनरागमन करणार आहे. सप्टेंबर २०२२  पासून जसप्रीत क्रिकेटपासून दूर आहे.  

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर,  लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उम्रान मलिक, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह ( India’s updated squad for Sri Lanka ODIs: Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, KL Rahul (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Washington Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Axar Patel, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umran Malik, Arshdeep Singh.) 

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजसप्रित बुमराहबीसीसीआय
Open in App