मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा आता थेट आपल्याला पुढच्याच वर्षी मैदानात दिसणार आहे. कारण दुखापतीमुळे त्याला यावर्षी एकही सामना खेळता येणार नाही. दुसरीकडे बीसीसीआयलाही त्याचे पुनरागमन या वर्षी नको असल्याचेही समजत आहे.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर बुमराला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले जात आहे. बुमराच्या पाठिला फ्रॅक्टर झाले आहे. त्यामुळे या दुखापतीवर उपचार करण्यासाठी आणि त्यामधून सारवण्यासाठी बुमराला काही महिने लागणार आहेत. त्यामुळे या वर्षामध्ये बुमराला एकही सामना खेळता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पण या वर्षात सामना खेळवण्यासाठी बीसीसीआयही तयार नसल्याचे म्हटले जात आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताला जसप्रीत बुमाराच्या रुपात मोठा धक्का बसला होता. या सामन्यातील हार्दिक पंड्याच्या 36व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना बुमराला दुखापत झाली. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना बुमरा चौकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील होता. पण बुमराला चौकार रोखता आला नाही. पण यावेळी क्षेत्ररक्षण करताना बुमराच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे बुमराला मैदानाबाहेर जावे लागले.
आता बुमराला या वर्षात एकही सामना खेळता येणार नाही. भारताच्या दौऱ्यावर बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे संघ येणार आहेत. या दोन्ही संघांविरुद्ध बुमराला खेळता येणार नाही. बुमराला ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता बुमरा आपल्याला थेट जानेवारीमध्येच मैदानात पाहायला मिळेल.