Breaking News : WTC Final 2023: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी दुखापतीचे ग्रहण भारतीय संघावर कायम आहेच आणि त्यामुळे संघाची मोठ बांधताना कर्णधार रोहित शर्माच्या नाकी नऊ येणार हे नक्की आहे. रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांनी दुखापतीमुळे आधीच माघार घेतली. तरीही BCCI ने १५ सदस्यीय संघ जाहीर केला, जो ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल खेळणार आहे. पण, त्यातल्या KL Rahul ला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली अन् अडचण निर्माण झाली.
लोकेश राहुलच्या जागी कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता होती आणि आज BCCI ने आज ते जाहीर केले.लोकेश राहुलला आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला आयपीएलसह WTC Final मधूनही माघार घ्यावी लागली. लखनौ सुपर जायंट्सच्या जयदेव उनाडकत यालाही सरावा दरम्यान त्याच दिवशी दुखापत झाली आणि तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. त्याच्या सहभागाबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. उमेश यादवही दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण, लोकेशच्या जागी संघात इशान किशनला ( Ishan Kishan) संधी देण्याचा निर्णय झाला आहे. केएस भरत हा एकमेव यष्टिरक्षक-फलंदाज संघात आहे आणि त्याला बॅक अप म्हणून इशानची निवड केली गेली आहे. ( The All-India Senior Selection Committee has named Ishan Kishan as KL Rahul’s replacement.)
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, इशान किशन ( India’s squad for WTC final: Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, Ajinkya Rahane, KS Bharat (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Shardul Thakur, Mohd. Shami, Mohd. Siraj, Umesh Yadav, Jaydev Unadkat, Ishan Kishan (wk).)
राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव ( Standby players: Ruturaj Gaikwad, Mukesh Kumar, Suryakumar Yadav.)