'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले

Asia Cup 2022 : भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. शाहिन आफ्रिदीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:22 PM2022-08-22T13:22:46+5:302022-08-22T13:23:59+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING NEWS : Mohammad Hasnain has been named as replacement of Shaheen Shah Afridi in AsiaCup 2022. Mir Hamza and Hassan Ali ignored | 'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले

'फेकी बॉलर' म्हणून ऑसी फलंदाजाचा आरोप, 'त्या' गोलंदाजाला पाकिस्तानने Asia Cup 2022 साठी निवडले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 : भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा संघ आशिया चषक २०२२ मध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आणि त्यामुळे त्याला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. शाहिनच्या जागी पाकिस्तानचा संघ मिर हम्झा किंवा हसन अली यांच्यापैकी एकाची निवड करतील असे वाटले होते. पण, PCB ने युवा गोलंदाज मोहम्म्मद हस्नैन ( Mohammad Hasnain) याची निवड केली.


भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत एकूण १४ सामने झाले आणि त्यात जय-पराजयाची आकडेवारी ही ८-५ अशी भारताच्या बाजूने आहे. पण, २८ ऑगस्टला भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानचे मनोबल खचले आहे. प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीला ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आफ्रिदीच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

आफ्रिदीच्या जागी PCB ने मोहम्मद हस्नैन याची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड केली आहे. काही आठवड्यांपूर्वी दी हड्रेंड लीगमध्ये हस्नैनच्या गोलंदाजीच्या शैलीवर ऑसी फलंदाज मार्कस स्टॉयनिसने 'फेकी' असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावरून बराच वादही झाला. हस्नैनची गोलंदाजी याहीपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि ICC ने त्याच्या शैलीची चाचणी घेतल्यानंतर त्याला पुन्हा गोलंदाजीची परवानगी दिली होती.


२२ वर्षीय गोलंदाजाने पाकिस्तानकडून १८ ट्वेंटी-२० सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या दी हंड्रेड लीगमध्ये खेळतोय आणि तो तिथून आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईत दाखल होईल.   

पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, मोहम्मद हस्नैन, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर. ( Pakistan squad for ACC T20 Asia Cup - Babar Azam (captain) (Central Punjab), Shadab Khan (vice-captain) (Northern), Asif Ali (Northern), Fakhar Zaman (Khyber Pakhtunkhwa), Haider Ali (Northern), Haris Rauf (Northern), Iftikhar Ahmed (Khyber Pakhtunkhwa), Khushdil Shah (Southern Punjab), Mohammad Hasnain (Sindh), Mohammad Nawaz (Northern), Mohammad Rizwan (Khyber Pakhtunkhwa), Mohammad Wasim Jnr (Khyber Pakhtunkhwa), Naseem Shah (Southern Punjab), Shahnawaz Dahani (Sindh) and Usman Qadir (Central Punjab).) 

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक

२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

Web Title: BREAKING NEWS : Mohammad Hasnain has been named as replacement of Shaheen Shah Afridi in AsiaCup 2022. Mir Hamza and Hassan Ali ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.