Asia Cup 2022 : भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा संघ आशिया चषक २०२२ मध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आणि त्यामुळे त्याला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. शाहिनच्या जागी पाकिस्तानचा संघ मिर हम्झा किंवा हसन अली यांच्यापैकी एकाची निवड करतील असे वाटले होते. पण, PCB ने युवा गोलंदाज मोहम्म्मद हस्नैन ( Mohammad Hasnain) याची निवड केली.
आफ्रिदीच्या जागी PCB ने मोहम्मद हस्नैन याची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड केली आहे. काही आठवड्यांपूर्वी दी हड्रेंड लीगमध्ये हस्नैनच्या गोलंदाजीच्या शैलीवर ऑसी फलंदाज मार्कस स्टॉयनिसने 'फेकी' असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावरून बराच वादही झाला. हस्नैनची गोलंदाजी याहीपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि ICC ने त्याच्या शैलीची चाचणी घेतल्यानंतर त्याला पुन्हा गोलंदाजीची परवानगी दिली होती.
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)