मुंबई : आयपीएल आपल्या आगामी (IPL 2024) हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच हार्दिक पांड्याच्या बातमीने मुंबईच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. लक्षणीय बाब म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची घरवापसी झाली असून आगामी हंगामात तो मुंबईच्या ताफ्यात खेळताना दिसणार आहे. जगातील सर्वांत लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. हार्दिकची घरवापसी होताच गुजरात टायटन्सने आपला नवा कर्णधार जाहीर केला असून शुबमन गिलच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात २०२२ मध्ये गुजरातचा संघ चॅम्पियन झाला होता. तसेच त्याच्या पुढच्या हंगामात गुजरातला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. मागील काही दिवसांपासून हार्दिक गुजरातची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला असून अधिकृतरित्या तो मुंबईच्या फ्रँचायझीचा सदस्य झाला आहे.
गिलकडे गुजरातच्या संघाची धुरा
हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.
Web Title: breaking news Mumbai Indians Announcement Hardik Pandya returns to Mumbai Indians ahead of IPL 2024, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.