Join us  

पाकिस्तानच्या बाबर आजमने पटकावला ICCचा मानाचा पुरस्कार; MS Dhoni, विराट कोहली यांच्याशी केली बरोबरी

आयसीसीच्या २०२२ मधील  सर्वोत्तम वन डे संघाचे कर्णधारपदही बाबर आजमकडे देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:50 PM

Open in App

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने आयसीसीचा २०२२ या वर्षातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. आयसीसीच्या २०२२ मधील  सर्वोत्तम वन डे संघाचे कर्णधारपदही बाबर आजमकडे देण्यात आले आहे. बाबरने सलग दुसऱ्या वर्षी वन डेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा मान पटकावताना भारताचा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

बाबरने २०२२ मध्ये ९ वन डे सामन्यांत ८४.८७च्या सरासरीने ६७९ धावा केल्या. बाबरने २०२२ वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान पटकावले आहे. बाबरने ९ वन डे सामन्यांत ३ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. २०२२मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने एकमेव पराभव पत्करला होता. मार्च महिन्यात लाहोर वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची ११४ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.   

आयसीसी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सलग दोनवेळा जिंकण्याचा पहिला मान महेंद्रसिंग धोनीने ( २००८ व २००९) मिळवला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स (  २०१४ व २०१५) आणि विराटने ( २०१७-२०१८) हा पराक्रम केला. या यादीत बाबर आजमने आज एन्ट्री घेतली. 

२०२२ मधील सर्वोत्तम वन डे संघ - बाबर आजमन ( कर्णधार), ट्रेव्हिस हेड, शे होप, श्रेयस अय्यर, सिकंदर रजा, मेहिदी हसन मिराज, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बाबर आजमआयसीसीमहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीएबी डिव्हिलियर्स
Open in App