Join us  

Breaking News: Rahul Dravid च टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार; पदासाठी केला अर्ज दाखल

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे मी वृत्तपत्रातूनच वाचतोय, असे विधान BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 4:49 PM

Open in App

रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कोण विराजमान होईल आणि कोण शर्यतीत आहेत, याचा फैसला आज होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) मुख्य प्रशिक्षकपदासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम तारीख होती. या पदासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचे नाव आघाडीवर होते, परंतु कालच BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं दिलेल्या विधानानंतर नेमकं काय चाललंय हेच कळत नव्हते. 

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे मी वृत्तपत्रातूनच वाचतोय, असे विधान गांगुलीनं केलं होतं. पण, मंगळवारी राहुल द्रविडनं या पदासाठी अर्ज दाखल करून सर्व संभ्रम दूर केला आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड याचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे राहुलचेच मुख्य प्रशिक्षकपद होणे निश्चित मानले जात आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यास राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( NCA) अध्यक्षपद रिक्त होईल आणि त्या पदासाठी व्ही व्ही एस लक्ष्मण यानं अर्ज दाखल केला आहे.    द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम  केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.  कोणकोणत्या पदांसाठी मागवलेत अर्ज१ मुख्य प्रशिक्षक ( वरिष्ठ संघ)  २ फलंदाजी प्रशिक्षक ३ गोलंदाजी प्रशिक्षक ४ क्षेत्ररक्षक प्रशिक्षक ५ Head Sports Science/Medicine with National Cricket Academy (NCA)

टॅग्स :राहूल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App