Join us  

Breaking News : खेळाडूंच्या विरोधानंतरही श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार

श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची आज घोषणा केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 7:23 PM

Open in App

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या संघातील दहा क्रिकेटपटूंन पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाही, असे वाटत होते. पण विरोध केलेल्या खेळाडूंना वगळून श्रीलंकेचा संघ निवडण्यात आला आहे आणि हा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची आज घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद लहिरु थिरीमानेला देण्यात आले आहे, तर ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व दासुन शनाकाकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

एकदिवसीय संघ : लाहिरु थिरिमाने (कर्णधार), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना. 

टी20 संघ : दासुन शनाका (कप्तान), सदीरा समाविक्रमा, अविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, अँजेलो परेरा, मिनोद भानुका, वानिंदु हसारंगा, लक्षन संदाकन, नुवान प्रदीप, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना और भानुका राजपक्षा.

पाकिस्तानात न खेळण्यासाठी भारताकडून श्रीलंकन खेळाडूंवर दबाव; पाक मंत्र्याचा अजब दावा: ट्वेंटी -20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि वन डे संघाचा कर्णधार दिमुख करुणारत्ने यांच्यासह श्रीलंकेच्या दहा प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. श्रीलंकन खेळाडूंच्या या निर्णयामागे भारताचा हात असल्याचा अजब दावा पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे.

श्रीलंका क्रिकेट संघ 27 सप्टेंबरपासून तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मलिंगा व करुणारत्नेसह थिसारा परेरा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशॅन डिकवेला, कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल आणि दिनेश चंडिमल यांनीही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. मार्च 2009च्या हल्ल्यानंतर श्रीलंकन संघ 2017मध्ये लाहोर येथे एक ट्वेंटी-20 सामना खेळला होता. आताच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेनंतर श्रीलंका येथे दोन कसोटी सामने खेळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेने 2015मध्ये पाकिस्तानात वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळले होते आणि वेस्ट इंडिजही 2018मध्ये तीन ट्वेंटी-20 सामने खेळले होते. 

श्रीलंकेच्या खेळाडूंना हा निर्णय घेण्यासाठी भारताकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा हुसैन यांनी केला. त्यांनी ट्विट केले की,'' एका समालोचकाने मला सांगितले की, भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर दबाव टाकला जात आहे. तुम्ही पाकिस्तानात खेळायला जात, तर तुम्हाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही, अशी धमकी लंकेच्या खेळाडूंना दिली जात आहे. हे पातळी सोडून वागणं आहे.'' 

 

श्रीलंकेच्या संघावर केला होता रॉकेट आणि हँड ग्रेनेडने हल्लानवी दिल्ली : श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायला नकार दिला. कारण बरोबर दहा वर्षांपूर्वी जेव्हा श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता तेव्हा त्यांच्या बसवर दहशतवादी हल्ला केला होता. त्या हल्ल्याच्या मनातील जखमा अजूनही ओल्या असल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी यावेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे.

श्रीलंकेचा संघ २००९ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ३ जानेवारी २००९ या दिवशी श्रीलंकेच्या संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरुवातीला बसवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर रॉकेट आणि हँड ग्रेनेडने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये कर्णधार महेला जयवर्धनेसह बरेच खेळाडू जखमी झाले होते.

टॅग्स :श्रीलंकापाकिस्तान