मुंबई : संजय बांगर यांची हकालपट्टी करत विक्रम राठोड यांची भारताच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात येऊ शकते. निवड समितीने तर राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण त्यांना फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यावर परस्पर हितसंबंध जपले जाणार नाहीत ना, हे तपासून पाहिल्यावरच त्यांच्याकडे हे पद देण्यात येणार आहे. त्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षपदी भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी श्रीधर यांना कायम ठेवण्यात आले आहे. निवड समितीने या पदांसाठी प्रधान्य कोणाला मिळणार यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनुक्रने राठोड, अरूण आणि श्रीधर यांची नावे पहिल्या स्थानावर आहेत.
निवड समितीने या पदासाठी आज मुलाखती घेतल्या होत्या. या पदासाठी बांगर, राठोड यांच्यासह मार्क रामप्रकाश हे उत्सुक होते आणि या तिघांना अग्रस्थान देण्यात आले होते. त्यानंतर निवड समितीने या तिघांच्या मुलाखती घेतल्या आणि या पदासाठी राठोड यांना निवड समितीने प्राधान्य दिले.
भारतीय क्रिकेट संघात होणार आता मोठा बदल
मुंबई : भारताच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची उचलबांगडी होणार असल्याचे दिसत आहे. कारण निवड समितीने याबाबत काही संकेत दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगर यांना निवड समितीने काही प्रश्न विचारले. या प्रश्नावर बांगर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे बांगर यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात, असे म्हटले जात आहे.
भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत तरी कोण, आता तिघांमध्येच चुरस
भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. पण अजूनपर्यंत सहाय्यक प्रशिक्षकांची निवड करण्यात आलेली नाही. पण निवड समितीने मात्र या प्रत्येक पदासाठी तीन जणांची निवड केली आहे. आता या तीन जणांमध्येच चुरस असेल.
फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी संजय बांगर, विक्रम राठोड आणि मार्क रामप्रकाश यांच्यांमध्ये आता स्पर्धा असेल. गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी भारत अरुण, पारस म्हाब्रे आणि वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, अभय शर्मा आणि टी. दिलीप यांच्यांमधून निवडण्यात येईल.
Web Title: Breaking News: Vikram Rathod to be India's new batting coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.