मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी शुक्रवारी भारताच्या संघाची निवड करण्यात येणार होती. पण आता भारतीय संघाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. पण निवड समितीची बैठक पुढे ढकलण्याचे नेमकं कारण आहे तरी काय...
आज भारतामध्ये कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दाखल झाले. त्यामुळे भारताची संघ निवड पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे. कारण संघ निवडीपूर्वी या मालिकेमध्ये हे दोन खेळाडू खेळणार की त्यांना विश्रांती हवी आहे, हे निवड समितीला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काही जणांच्या मते निवड समितीला धोनीबरोबर त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करायची आहे, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे निवड समितीने काही दिवसांनंतर निवड समितीची बैठक घेण्याचे ठरवले आहे.
निवड समितीची बैठक पुढे ढकलण्यामागे काही तांत्रिक गोष्टी असल्याचेही म्हटले जात आहे. बीसीसीआय, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे निवड समितीची बैठक पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे.
आता कधी होणार बैठक
शुक्रवारी होणारी निवड समितीची बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता शनिवारी किंवा रविवारी होऊ शकते. त्यावेळीही संघ जाहीर केला जाऊ शकतो. पण काही जणांच्या मते सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा भारतीय संघ जाहीर होईल, असे म्हटले जात आहे.
Web Title: Breaking news: West Indies team selection postpone
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.