मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. या भारताच्या संघातून महेंद्रसिंग धोनीला स्थान न दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यापुढे भारताच्या ट्वेन्टी-20 संघात धोनी असणार की नाही, याबद्दल चर्चा सुरु आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात धोनीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, असे म्हटले जाते. त्याचबरोबर या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेणार, अशी चर्चा होती. विश्वचषकानंतर धोनी भारतीय आर्मीबरोबर काश्मीरमध्ये सरावासाठी गेला होता. त्यानंतर धोनी आपल्या घरी परतला असून त्याने काही जाहीरातींचे शूटींगही केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आपल्याला संधी मिळेल, अशी धोनीला आशा होता, पण तसे मात्र होताना दिसत नाहीए.
ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी निवड समिती करणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी धोनीपेक्षा पंतला संधी देण्यात येऊ शकते. त्यामुळे आता यापुढील ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये धोनीला संधी मिळणार नसल्याचेच दिसत आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये आमच्या खेळाडूंची काय चूक होती? - महेंद्रसिंग धोनी
‘आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील २०१३ साली झालेली स्पॉट फिक्सिंगची घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. यामुळे मी पहिल्यांदाच अत्यंत निराश झालो होतो,’ असे सांगत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पहिल्यांदाच या फिक्सिंग प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, ‘या प्रकरणात खेळाडूंची काय चूक होती?’ असा प्रतिप्रश्नही धोनीने केला.
गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना या प्रकरणावर धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. कारण यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संघावर दोन वर्षांची बंदी लागलीच, शिवाय फिक्सिंग प्रकरणामध्ये धोनीवरही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळेच आपण आयुष्यात पहिल्यांदाच निराशेच्या गर्तेत अडकलो होतो, असे धोनीने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी शानदार पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने थेट जेतेपदावर कब्जा करत आपला हिसका दाखवून दिला. या धमाकेदार पुनरागमनावर आधारित असलेल्या ‘रोर आॅफ दी लायन’ या वेब सीरिजमध्ये धोनीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये धोनीने म्हटले आहे की, ‘या प्रकरणाआधी मी कधीच इतका निराश झालो नव्हतो. या घटनेनंतर माझ्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आणि दोन वर्षे आमचा संघ आयपीएल खेळू शकला नाही. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात खराब वेळ होती. २००७ साली भारतीय संघ खराब प्रदर्शनामुळे हरला होता, पण २०१३चे स्पॉट फिक्सिंग प्रकरण पूर्णपणे वेगळे होते.’
Web Title: Breaking News!Mahendra Singh Dhoni will be sacked from Indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.