ICC Cricket World Cup 2023 - भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) रोज नवनवीन नाटकं करताना दिसत आहे. BCCIच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेसोबत विभागावे लागले. त्यानंतर PCB ने भारतातील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सहभागाचा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल अशी भूमिका घेतली. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघाला भारत दौऱ्यावर पाठवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने ११ सदस्यीय समिती नेमली होती आणि आज त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये आयसीसीसमोर PCB व पाकिस्तान सरकारने अट ठेवली आहे. पाकिस्तान सरकारने आणि PCB ने आयसीसीकडे पाकिस्तान संघाच्या सुरक्षेची लेखी हमी आयसीसीकडे मागितली आहे.
दरम्यान, नवरात्रीमुळे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यातला सामना १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानचा संघ शेवटचा भारतात आला होता. बीसीसीआयचे सचिव यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या २-३ देशांनी वेळापत्रकात काही बदल सुचवले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आयसीसी व बीसीसीआय हे सुधारित वेळापत्रक कधी जाहीर करतेय, याची उत्सुकता आहे. आगामी वर्ल्ड कप २०२३ च्या वेळापत्रकात एकूण ६ सामने बदलले जाऊ शकतात.
या सामन्यांमध्ये होणार बदलवर्ल्ड कप सामना पहिली तारीख शिफ्ट तारीखभारत विरुद्ध पाकिस्तान १५ ऑक्टोबर १४ ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका १२ ऑक्टोबर १० ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड ९ ऑक्टोबर १२ ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान १४ ऑक्टोबर ( संध्या) १४ ऑक्टोबर ( दिवसा) न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश १४ ऑक्टोबर १५ ऑक्टोबर