आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१पासून जाहीर केलेल्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये जानेवारी व फेब्रुवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. जानेवारी महिन्यातील Men’s Player of the Month पुरस्कार टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यानं पटकावला होता. आता भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin) यानं फेब्रुवारी महिन्याचा पुरस्कार पटकावला. त्यानं इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) आणि वेस्ट इंडिजचा ( Kyle Mayers) यांना चीतपट केलं. ( The ICC Men’s Player of the Month of February winner )
आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या ICC Men’s Player of the Month पुरस्काराचा पहिला मानकरी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ठरला. या पुरस्कारासाठी रिषभसमोर इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) आणि आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते. जो रूटनं या महिन्यात दोन कसोटींत १०६.५०च्या सरासरीनं ४२६ धावा केल्या. आयर्लंडच्या स्टीर्लिंगनं वन डे सामन्यात १०५च्या सरासरीनं ४२० धावा चोपल्या, तर रिषभनं ८१.६६च्या सरासरीनं २४५ धावा केल्या. WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?
फेब्रुवारी महिन्यातील खेळाडूंची कामगिरी जो रूट - २१८ धावा, ५५.५ सरासरी आणि ६ विकेट्सआर अश्विन - १०६ धावा, ३५.२ सरासरी आणि २४ विकेट्स, १५.७ सरासरीकायले मेयर्स - २६१ धावा, ८७ सरासरी