घरच्या मैदानावर श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांना पराभवाची चव चाखवल्यानंतर टीम इंडिया 2020 मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारतीय संघानं नववर्षातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेवर 2-0 असा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळपट्टींवर वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया आणखी तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. पण, या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली होती. त्यात तिसऱ्या सामन्यात अधिक भर पडली आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे धवनच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही साशंकता होती. अखेर धवनला किवी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. टीम इंडियासोबत धनव ऑकलंडला रवाना झाला नाही.
24 जानेवारी पासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. धवनच्या माघारीमुळे ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसन, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तिघेही सध्या भारत अ संघासोबत न्यूझीलंडमध्येच आहेत. दुखापतीतून सावरताना पृथ्वीनं न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध 100 चेंडूंत 150 धावांची खेळी नुकतीच केली आहे.
भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस ( 4-5 सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम ( पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी.
यावेळी न्यूझीलंडवर आम्ही वर्चस्व गाजवणार; सांगतोय कर्णधार विराट कोहली
पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
दौऱ्याचं वेळापत्रक
ट्वेंटी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 24 जानेवारी, दुपारी 12.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 26 जानेवारी, दुपारी 12.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 जानेवारी, दुपारी 12.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 31 जानेवारी, दुपारी 12.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 2 फेब्रुवारी, दुपारी 12.30 वा.
वन डे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
कसोटी
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 21 ते 25 फेब्रुवारी, पहाटे 4 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, पहाटे 4 वा.
Web Title: Breaking : Shoulder injury rules Shikhar Dhawan out of New Zealand T20Is
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.