भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून पुण्यात सुरू होत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला संघांमध्ये वन डे मालिकाही होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी बडोदा येथे होणार आहे. सहा सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय महिलांनी विजय मिळवला आणि आता वन डे मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. पण, टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मानधनाला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
भारतीय संघ - मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, तानिया भाटीया, एकता बिस्त, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, दयालन हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, पूनम यादव, प्रिया पुनिया, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा.
वन डे मालिकेचे वेळापत्रकपहिला सामना - 9 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजल्यापासूनदुसरा सामना - 11 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजल्यापासूनतिसरा सामना - 14 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजल्यापासून