मोठी बातमी : सौरव गांगुलीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी; IPL फ्रँचायझीची जबरदस्त खेळी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल मोठी बातमी येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:01 PM2023-01-03T16:01:58+5:302023-01-03T16:02:18+5:30

whatsapp join usJoin us
Breaking: Sourav Ganguly returns to Delhi Capitals as Director of Cricket, to be in-charge of all cricketing affairs | मोठी बातमी : सौरव गांगुलीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी; IPL फ्रँचायझीची जबरदस्त खेळी

मोठी बातमी : सौरव गांगुलीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी; IPL फ्रँचायझीची जबरदस्त खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sourav Ganguly appointed as 'Director of Cricket' for IPL franchise -  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल मोठी बातमी येत आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. सौरव गांगुली आता आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्समध्ये ( Delhi Capitals) एका महत्त्वाच्या पदावर काम करणार आहे. गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेटचे नवे संचालक बनवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदानंतर आता सौरवकडे मोठी जबाबदारी आली आहे.

BREAKING NEWS: जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट्स; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात बदल

आयपीएल २०१९मध्ये गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर होता, परंतु बीसीसीआयची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याला ही जबाबदारी सोडावी लागली. पण, आता गांगुली पुन्हा दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करणार आहे आणि गांगुली-रिकी पाँटिंग ही जोडी पुन्हा दिसणार आहे. पाँटिंग हा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. ''त्याने यापूर्वीची फ्रँचायझीसोबत काम केले आहे. त्याचे संघमालकांसोबत चांगले संबंध आहेत आणि आयपीएलमध्ये त्याला जेव्हा केव्हा परतायचे असेल तो दिल्ली कॅपिटल्सकडूनच पुनरागमन करेल,''असे IPL च्या एका अधिकाऱ्याने PTI  ला सांगितले.  


 रिषभ पंतच्या अपघातामुळे दिल्ली कॅपिटल्सला तात्पुरत्या कर्णधाराची गरज आहे. रिषभला आयपीएल २०२३च्या संपूर्ण किंवा किमान पहिल्या टप्प्याला मुकावे लागणार आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अशात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कडे सोपवली जाऊ शकते. मनीष पांडे हाही पर्यात आहे पण नुकत्याच झालेल्या लिलावात तो संघात सामील झाला आहे.  

दिल्ली कॅपटिल्स - रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Breaking: Sourav Ganguly returns to Delhi Capitals as Director of Cricket, to be in-charge of all cricketing affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.