ICC Men's T20I Player of the Year award for 2022 - भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने २०२२ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० खेळाडूचा पुरस्कार पटकावला. सूर्याकुमारने २०२२ या वर्षात ३१ ट्वेंटी-२० सामन्यात ४६.५६च्या सरासरीने ११६४ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमारने २०२२ मध्ये ट्वेंटी-२०त ३१ सामन्यांत सर्वाधिक ११६४ धावा केल्या. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १००० धावा करणारा तो पहिला भारतीय आणि रिझवाननंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. सिकंदरने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. त्याने २०२२ मध्ये ट्वेंटी-२०त २४ सामन्यांत ७३५ धावा व २५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता गोलंदाज सॅम करनने १९ सामन्यांत २५ विकेट्स व ६७ धावा केल्या आहेत, तर रिझवानने २५ सामन्यांत ९९६ धावा केल्या आणि ९ झेल व ३ स्टम्पिंग केले.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने २०२१मध्ये वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. पण, यावेळेस त्याच्यासमोर भारताचा सूर्यकुमार यादव, झिम्बाब्वेचा सिकंदर रजा व इंग्लंडचा सॅम करन यांचे आव्हान होते आणि त्यात सूर्याने बाजी मारली.
महिलांमध्ये भारताच्या स्मृती मानधनासह पाकिस्तानची निदा दार, न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्राथ ट्वेंटी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारच्या शर्यतीत आहेत. मानधनाची २०२२च्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघातही निवड झाली आहे. तिने २०१८ व २०२१ मध्ये वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिला जाणारा राचेल हेयहोए फ्लिंट चषक जिंकला आहे. यंदाही ती या चषकाच्या स्पर्धेत आहे.
तिला ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी, न्य़ूझीलंडची अॅमेलिया केर व इंग्लंडची नॅट शिव्हर यांची टक्कर आहे. मानधनाने २०२२ मध्ये २३ ट्वेंटी-२० सामन्यांत ५९४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानची निदा दार हिने १६ सामन्यांत १५ विकेट्स व ३९६ धावा, तर सोफी डिव्हाईनने १४ सामन्यांत १३ विकेट्स व ३८९ धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. मॅकग्राथनेही १६ सामन्यांत ४३५ धावा व १३ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Breaking: Surya Kumar Yadav wins the ICC Men's T20I Player of the Year award for 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.