भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा प्रथमच कसोटीत सलामीला येणार आहे. शिवाय या सामन्यात रिषभ पंतला संधी मिळेल की नाही, याची उत्सुकता लागली होती. पंतला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे संघातील त्याच्या स्थानाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी अंतिम अकरा जणांची नावं मंगळवारी जाहीर केली.
रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांचा सलामीला म्हणून विचार केला गेला असून अश्विन कसोटी संघात कमबॅक करत आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहली म्हणाला,''कसोटी मालिकेत वृद्धीमान साहच यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असेल.'' याशिवाय आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हेही संघात असतील, तर तिसरा फिरकी पर्याय म्हणून हनुमा विहारी संघात असेल, असेही कोहलीने स्पष्ट केले होते.
भारताचा संघ : विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धीमान सहा (यष्टिरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी